काविळ झालेल्याला जग पिवळं दिसतं !’ आपल्याकडे अगदी सहजपणे वापरला जाणारा वाक्प्रचार ! खरंच काविळ म्हणजे काय, तर एखादा सामान्य माणूसही ढोबळपणे काविळीची व्याख्या अशी सांगेल, “काविळ म्हणजे डोळे आणि त्वचा पिवळी दिसणे.’ सामान्यतः काविळ हा शब्द मराठीत दोन वेगळ्या अर्थांनी वापरला जातो. खरंतर त्वचा व डोळे पिवळे होणे ज्याला इंग्रजीत ‘जॉन्डीस’(jaundice) किंवा आधुनिक वैद्यकशास्त्रात ‘इक्टेरस’(Icterus) असे म्हटले जाते, हा प्रत्यक्ष आजार नसून यकृताशी(लिव्हर- Liver) निगडीत विविध आजारांच्या लक्षणांपैकी एक लक्षण आहे. मराठीत या लक्षणासाठी जसा ‘काविळ’ हा शब्द वापरला जातो तसाच तो ‘हिपॅटाइटीस’ (Hepatitis) या यकृताच्या विषाणूजन्य आजारासाठीही समानार्थी शब्द म्हणून वापरला जातो. इथे मी ‘जॉन्डीस’बद्दल बोलणार आहे आणि वाचकवर्गाचा गोंधळ होऊ नये, यासाठी ‘यकृताशी निगडीत आजारात त्वचा व डोळ्यांना पिवळेपणा येणे’ यास ‘पीतता’, तर ‘हिपॅटायटीस’ या यकृताच्या विषाणूजन्य आजारासाठी ‘यकृतशोथ’ हे संस्कृत शब्द वापरणार आहे. [ यकृत – लिव्हर (Liver), शोथ/शोफ – इनफ्लमेशन(inflammation)-दाह,सुज या अर्थाने ]
‘पीतता’ आणि त्यामागची कारणे समजून घेण्यासाठी आधी यकृत व निगडीत अवयवांची कार्यप्रणाली समजून घ्यायला हवी. यकृत म्हणजे अगदी थोडक्यात शरिराचा 'रासायनिक कारखाना' ! यकृतात असंख्य रसायनांवर प्रक्रिया चालू असते. तुर्तास आपण ‘पीतते’शी निगडीत रसायनांकडे लक्ष देऊ, त्याचे मुळ आपल्या शरिरातील लाल रक्तपेशींत (Red Blood Cells -RBC's ) आहे. जुन्या झालेल्या लाल रक्तपेशींचे प्लीहेमध्ये (Spleen) विघटन होते. याच कारणामुळे प्लीहेस ‘Graveyard of RBC's ‘ असेही म्हटले जाते. लाल रक्तपेशी व हिमोग्लोबिन यांच्या विघटनातून ‘बिलीरुबीन’(bilirubin) नावाचे रसायन तयार होते. अर्थात हे रसायन टाकाऊ असते,ते विष्ठा व लघवीद्वारे शरिराबाहेर टाकावे लागते. मात्र खरी गोची,अशी आहे की या बिलीरुबीनची पाण्यातील विद्राव्यता फारंच कमी असते, त्यामुळे रक्ताद्वारे ते वाहून नेणे कठीण असते. यकृतात या रसायनावर काही प्रक्रिया करुन बिलीरुबीनच्या एका रेणूस ग्लुकोरोनाईड नावाचा दुसरा रेणू जोडला जातो. या प्रक्रियेस कॉन्ज्युगेशन म्हणतात. कॉन्ज्युगेशन म्हणजे सोप्या भाषेत बांधणे किंवा जोडणे. अशाप्रकारे ग्लुकोरोनाइड रेणूंना जोडलेल्या बिलीरुबीन रेणूला ‘कॉन्ज्यूगेटेड बिलीरुबीन’ म्हणतात. याच्या उलट जर असे कॉन्ज्यूगेशन झालेले नसेल,तर त्यास ‘अनकॉन्ज्यूगेटेड बिलीरुबीन’ म्हणतात. कॉन्ज्यूगेटेड बिलीरुबीनची पाण्यातील विद्राव्यता अनकॉन्ज्यूगेटेड बिलीरुबीनपेक्षा अधिक असत. हे रेणू पित्तातून पित्ताशय व पित्ताशयनलिकेद्वारे आतड्यात सोडले जाते. पित्ताशयनलिकेतून वाहणारे पित्त हे अशा काही रसायनांचे मिश्रण असते. आतड्यातून हे कॉन्ज्यूगेटेड बिलीरुबीन पुन्हा रक्तात मिसळणे जवळपास अशक्यंच असते. त्यानंतर त्याचा बराचसा भाग ‘स्टर्कोबिलीन’ स्वरूपात विष्ठेवाटे, तर अनकॉन्ज्यूगेटेड असा काही भाग रक्तात मिसळला जाऊन ‘युरोबिलीन’ स्वरुपात लघवीवाटे बाहेर टाकला जातो. आपल्या लघवी आणि विष्ठेला जो विशिष्ट रंग प्राप्त होतो,तोसुद्धा या लघवीतील 'युरोबिलीन' व विष्ठेतील 'स्टर्कोबिलीन' मुळेच ! अशाप्रकारे हे बिलीरुबीन बनते तिथपासून त्याच्यावर रासायनिक प्रक्रिया होऊन ते शरिराबाहेर फेकले, या संपूर्ण प्रक्रियेतील वेगवेगळ्या पायऱ्यांवर काहीही अडथळा निर्माण झाला, की हे बिलीरुबीन (कॉन्ज्यूगेटेड किंवा अनकॉन्ज्यूगेटेड), बाहेर टाकले जाण्याऐवजी रक्तात साठून राहू लागले, की ते जास्तीचं बिलीरुबीन शरिरात ज्या ठिकाणी जोरकस रक्तप्रवाह आणि प्रथिनांचं प्रमाण अधिक आहे,तिथे जाऊन साचून राहायला सुरुवात होते. प्रामुख्याने डोळ्यांचा पांढरा भाग (Sclera) ,श्लेष्मल पडदे (mucous membranes)व त्वचा यामध्ये साचून राहू लागते आणि हे भाग पिवळे दिसू लागतात आणि आपण म्हणतो, ‘काविळ झाली’ !!

अशाप्रकारे बिलीरुबीन का साठून राहत असेल ? अगदी सोपे उदाहरण घेऊन समजून घेऊ; दैनंदिन जीवनात घराघरांतून जो कचरा/सांडपाणी तयार होते, ते एका ‘वेस्ट ट्रिटमेंट प्लान्ट’ मध्ये गोळा करुन, त्यावर प्रक्रिया करुन मग विल्हेवाटीसाठी सोडले जाते. मी आधी म्हणालो तसं यकृत हा असा विविध रसायनांवर प्रक्रिया करणारा कारखाना आहे, पित्ताशय व पित्ताशयनलिका ही ती प्रक्रिया केलेली रसायनं पुढे वाहून नेणारी ‘पाईपलाइन’ आहे. एवढं डोक्यात ठेवल्यावर ‘पीतते’ची कारणे पुढील प्रकारांत विभागता येतील..
१. आपल्या रासायनिक कारखान्याची जितक्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता आहे, त्यापेक्षा अधिक कचरा निर्माण होण्यास सुरुवात झाली तर ??
थोडक्यात ‘बिलीरुबीन प्रोडक्शन’ वाढले तर ?
जेव्हा लाल रक्तपेशींचं मोठ्या प्रमाणात विघटन होऊ लागेल, तेव्हा त्या प्रक्रियेचं ‘बायप्रोडक्ट’, ते बिलीरुबीनंही मोठ्या प्रमाणात तयार होऊ लागेल. असं केव्हा होतं ? लाल रक्तपेशींचं विघटन केव्हा वाढतं ?
• सिकल सेल अॅनिमिया, थॅलॅसेमिया यासारखे हिमोग्लोबिनचे आजार ज्यामध्ये लाल रक्तपेशींची मोठ्या प्रमाणात मोड-तोड होते.
• लाल रक्तपेशींचा आकार बदलणारे स्फीरोसायटॉसिस, एलिप्टोसायटॉसिस यासारखे तर पेशींतील रासायनिक प्रक्रियांमध्ये अडथळे आणणारे आजार, जसे G6PD (Glucose 6 Phosphate dehydrogenase) deficiency, पायरुवेट काइनेज् डेफिशिअन्सी ( pyruvate kinase deficiency )
• मलेरिया सारखे आजार ज्यामध्ये रोगकारक परजीवी लालरक्तपेशीतंच राहतात आणि परिणामी पेशींची मोडतोड होऊ लागते.
• लाल रक्तपेशींच्या निर्मितीत येणारा अडथळा उदा. थॅलॅसेमिया, कोबालामिन, फॉलिकअॅसिड इ. जीवनसत्वांची किंवा गंभीर स्वरुपात शरीरात लोहाची कमतरता इ.
• रक्तसंक्रमणाशी निगडीत दुष्पारिणाम
या प्रकारात रक्तातीतील बिलीरुबीनचे प्रमाण इतके वाढलेले असते, की यकृत तितक्या प्रमाणातील बिलीरुबीनवर प्रक्रिया करण्यात असमर्थ ठरते. बरचेसे बिलीरुबीन यकृतात कॉन्ज्युगेट न होता, ‘अनकॉन्ज्युगेटेड’ राहते. म्हणजे समजा तुमच्यात पीतता दिसत असेल आणि तुमच्या रक्ताची तपासणी करुन बिलीरुबीनचे प्रमाण काढले तर त्यात ‘कॉन्ज्युगेटेड’ पेक्षा ‘अनकॉन्ज्युगेटेड’ बिलीरुबीन अधिक दिसेल. यावरुन तुमचे डॉक्टर तुमच्या पीततेच्या कारणाचा अंदाज करु शकतात.
आधीच मी लेखात सांगितलं त्याप्रमाणे लघवी आणि विष्ठेलाही बिलीरुबीनपासून बनणाऱ्या त्यामधील अनुक्रमे 'युरोबिलीन' व 'स्टर्कोबिलीन' मुळेच विशिष्ट रंग प्राप्त होतो. त्यामुळे बिलीरुबीनवरील प्रक्रियेत काही घोटाळा झाला, तर लघवी आणि विष्ठेचा रंगही बदलतो. त्यावरुनही पीततेच्या कारणाचा अंदाज करता येतो. 'पीतते'च्या या प्रकारात लघवीचा पिवळेपणा कमी होतो;पण विष्ठेचा रंग बदलत नाही.
प्रक्रिया करणाऱ्या कारखान्यातंच काही बिघाड झाला तर ??

एकदा यकृताच्या कार्यप्रणालीवर परिणाम झाला, की कोलमडलाच सर्व बाजार ! उदा. -
• यकृताचे जनुकीय आजार (Gilbert's disease, Criggler-Najjar Syndrome etc.)
• क्षयरोग, कर्करोग इ. वरील काही औषधांचे दुष्परिणाम.
• यकृतशोथ अर्थात हिपॅटायटीस. (Hepatitis A,B,C,D,E तसेच EBV,HSV,CMV यासारख्या विषाणूंमुळे होणारे यकृताचे आजार )
• मद्यपींमध्ये होणार यकृताचे आजार
• लिवर सिऱ्हॉसिस (Liver cirrhosis) (यकृतातील कार्यक्षम पेशींचा ऱ्हास होणे.)
• यकृताचे कर्करोग
यकृतावर परिणाम करणारे आजार असंख्य आहेत,ही वानगीदाखल दिलेली काही उदाहरणे आहेत. अशा प्रकारच्या पीततेत रक्ताची तपासणी केली असता, कधी ‘कॉन्ज्युगेटेड’ तर कधी दोन्हीही प्रकारचे बिलीरुबीन वाढलेले असते. या प्रकारात लघवी गडद रंगाची तर विष्ठा कधी सामान्य तर कधी गडद रंगाची असू शकते.
३. सगळंकाही सुरळीत चालू आहे;पण विल्हेवाटीसाठी कचरा वाहून नेणाऱ्या पाइपलाईनमध्ये काही बिघाड झाला तर ?
यामागची कारणे पुढीलप्रमाणे देता येतील –
• पित्ताशय व पित्ताशयनलिकेला आलेली सुज.
• पित्ताशयातील खडा
• पित्तमार्गातील गाठ
• पित्ताशयनलिकेजवळंच स्वादुपिंड (Pancreas) असतं. या स्वादुपिंडाला सुज आली किंवा स्वादुपिंडाला गाठ झाली म्हणजे पित्ताशयनलिकेवर दाब वाढून पित्त पुढे वाहून जाण्यास अडथळा येतो आणि त्यातील ‘बिलीरुबीन’ साठून राहू लागतं.
अशा प्रकारच्या पीततेत रक्ताची तपासणी केली असता, ‘कॉन्ज्युगेटेड’ बिलीरुबीन अधिक वाढलेलं असतं. या प्रकारात लघवी गडद रंगाची तर विष्ठेचा रंग बराचसा फिकट होत जातो.
नवजात बालकांमध्ये कधी कधी जन्माच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून ‘पीतता’ दिसू लागते. यात शक्यतो घाबरुन जाण्यासारखं काहीच नसतं. नवजात बालकाचे यकृत बिलीरुबीनवर व्यवस्थित प्रक्रिया करण्याइतके सक्षम झालेले नसते, क्वचिक आईचे दुध बाळास पुरेसे मिळत नसेल, तर त्यानेही पीतता दिसते. याला ‘फिजीओलॉजीकल जॉण्डीस’ म्हणतात. त्याने घाबरुन न जाता आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. चौथ्या-पाचव्या दिवसापर्यंत पीतता वाढत जाऊन पोट, हातापायाचे तळवेही पिवळे दिसू लागले, मग मात्र अजिबात हलगर्जीपणा करायला नको. त्वरीत डॉक्टर गाठावेत.
पीतता कशी आणि का होते, याची सर्वसाधारण कारणे आपण समजून घेतली. एकूणंच हा प्रकार किती गुंतागुंतीचा आहे, हे लक्षात आलं असावं. तेव्हा ‘काविळ झाल्याबरोबर, आता अमकं खा, तमकं खाऊ नका..’ असले सल्ले ऐकत बसण्यापेक्षा सरळ डॉक्टर गाठावेत आणि त्यांच्या सल्ल्यानेच उपचाराला सुरुवात करावी. आता आपला प्रश्न – खरंच काविळ झाल्यावर जग पिवळं दिसतं का ?
याचं उत्तर अर्थातंच ‘नाही’ असं येईल. बिलीरुबीन डोळ्याच्या सफेद भागात, ज्याला स्क्लेरा असं म्हणतात, तिथे साठतं. स्क्लेरा पुर्णपणे अपारदर्शक असते, तिचा आपल्याला ‘दिसण्यामागे’ काहीच रोल नसतो. प्रकाश डोळ्यांतून जिथे आत जातो, त्या डोळ्यांच्या बाहुलीसमोर व बुबूळावर एक पातळ पारदर्शक पापुद्रा असतो, त्याला कॉर्निआ (cornea) म्हणतात. कॉर्निआला स्वतःचा रक्तप्रवाह नाही,त्यामुळे रक्तातले बिलीरुबीन तिथे जाऊन साठण्याचा प्रश्नंच येत नाही आणि डोळे पिवळे दिसले, तरी ‘काविळ झालेल्याला जग पिवळं दिसत नाही !’
© सागर पाध्ये
विशेष आभार - श्री. वरुण सावंत
विशेष आभार - श्री. वरुण सावंत

खुपच सोप्या भाषेत सुंदर माहिती.
ReplyDeleteमनःपुर्वक धन्यवाद !
ReplyDeleteNice
ReplyDeleteThanks !
DeleteVery Nice Article
ReplyDeleteThanks!
Deleteआयुर्वेद तज्ञ!
ReplyDeleteमी आयुर्वेदतज्ञ नाही शैलेंद्रजी, MBBS ची पदवी घेतली आहे !
ReplyDelete